
कोथरूडमध्ये थार गाडीची धडक; पाच दुचाकींचे नुकसान, चालक पसार
१२ मे २०२५, कोथरूड, पुणे
रविवारी सायंकाळी कोथरूडमधील निंबाळकर चौकात एका थार गाडीने पाच दुचाकींना जोरदार धडक दिला. हा अपघात साडेआठच्या सुमारास घडला आणि त्यात अनेक दुचाकींचे मोठे नुकसान झाले. घटनास्थळी पोलिस आणि स्थानिक प्रशासनाने धाव घेतली, पण अपघातानंतर चालक घटनास्थळावरून पसार झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, गाडी (MH 12 UN 1306) ज्याच्या चालकाने दुचाकींना धडक दिली, तो काळ्या रंगाचा थार होता. या गाडीने हिरो अॅक्टीव्हा, विस्पा VXL, टीव्हीएस ज्युपिटर, आणखी एक अॅक्टीव्हा आणि यामाहा या दुचाकींना जबरदस्त धडक दिली. या अपघातामध्ये दुचाकींना मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले, परंतु सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. अपघाताची तक्रार दुकानाचे मालक विश्वेष विजय देशपांडे यांनी अलंकार पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली आहे.
विशेष विजय देशपांडे यांनी सांगितले की, “मी दुकानात होतो आणि अचानक एक जोरदार आवाज आला. बाहेर जाऊन पाहिलं, तेव्हा काही दुचाकींचे नुकसान झाले होते. मी गाडी चालकाला गाडी बाजूला घेण्यास सांगितले, तो होकार देऊन थांबला, पण काही क्षणातच तो गाडी घेऊन पळून गेला.”
अपघातानंतर परिसरात तणाव निर्माण झाला. स्थानिकांनी अपघाताची माहिती पोलिसांना दिली आणि आरोपीच्या शोधासाठी शोधमोहीम सुरू केली. घटनास्थळी पोलीस निरीक्षक आणि टीम पोहोचली आणि त्यांनी स्थानिकांच्या मदतीने तपास सुरू केला.
दुचाकींना धडक देणाऱ्या वाहनचालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. असे अपघात वाढत चालले आहेत आणि बेजबाबदार वाहनचालकांवर कठोर कारवाई केली गेली पाहिजे, असे ते म्हणाले.
हा अपघात शहरातील वाहतूक सुरक्षा आणि वाहनचालकांच्या जबाबदारीबद्दल महत्त्वपूर्ण प्रश्न उपस्थित करतो. वाहतूक नियमांचे पालन न करणारे वाहनचालक आणि त्यांचे बेजबाबदार वागणे नागरिकांच्या सुरक्षेसाठी धोका बनू शकते, हे लक्षात घेतले पाहिजे.
आदिक बटमनसाथी मराठा प्रेसचे नवे संपादक बनले