
भारत-पाकिस्तान संघर्ष उग्र; लाहोरवर भारताचा प्रतिहल्ला, महाराष्ट्रात रेड अलर्ट!
मुंबई, ९ मे २०२५
भारत आणि पाकिस्तानमधील तणाव गुरुवारी रात्री शिगेला पोहोचला, जेव्हा पाकिस्तानने जम्मू काश्मीर, पंजाब आणि राजस्थान येथील सीमावर्ती भागांवर ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न केला. भारतीय सुरक्षादलांच्या सतर्कतेमुळे हे सर्व हल्ले अपयशी ठरवले गेले. त्यानंतर भारतानेही तात्काळ प्रत्युत्तर देत पाकिस्तानच्या लाहोर शहरावर जोरदार हवाई कारवाई सुरू केली आहे.
भारतीय लष्कराच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारताने पाकिस्तानच्या तीन लढाऊ विमानांना पाडले असून, सीमारेषेवर झालेल्या ड्रोन हल्ल्यांना भारतीय हवाई संरक्षण तुकड्यांनी त्वरित प्रत्युत्तर दिले. गुरुवारी रात्री, पाकिस्तानने जम्मूतील एका भारतीय हवाई तळावर रॉकेटने हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र भारतीय लष्कराच्या आधुनिक S-400 क्षेपणास्त्र प्रणालीने पाकिस्तानच्या ८ क्षेपणास्त्रांना हवेतच निष्प्रभ केले, त्यामुळे मोठ्या संकटाला तोंड देणे टळले.
पार्श्वभूमीवर घडत असलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्यात तातडीची बैठक सुरू आहे. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याची शक्यता आहे.
पाकिस्तानच्या ही नापाक कारवायांनंतर देशभरात सतर्कता वाढवण्यात आली आहे. विशेषतः महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरांमध्ये रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांची सर्व सुट्ट्या रद्द करण्यात आल्या असून, शहरभरात सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली आहे.
भारताच्या प्रत्युत्तरात्मक कारवाईमुळे पाकिस्तानच्या लाहोर शहरात वीजपुरवठा खंडित झाला आहे, तसेच अनेक ठिकाणी भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. पाकिस्तानच्या माध्यमांनुसार, भारतीय लष्कराच्या हवाई हल्ल्यांमुळे त्यांचं महत्त्वाचं कम्युनिकेशन नेटवर्कही कोलमडलं आहे.
भारतीय लष्कर आणि केंद्र सरकारने यापूर्वीच स्पष्ट केलं होतं की, जर पाकिस्तानने कोणताही आगळीक करण्याचा प्रयत्न केला, तर त्याला कठोर आणि निर्णायक उत्तर दिलं जाईल. पाकिस्तानच्या या हल्ल्यानंतर भारताने आपलं वचन पाळत तातडीने प्रतिहल्ला केला आहे.
चीनबरोबरच देशभरात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असली तरी, भारतीय लष्कर पूर्णपणे सज्ज आहे आणि नागरिकांनी अफवावर विश्वास न ठेवता अधिकृत घोषणावर विश्वास ठेवावा, असं आवाहन गृह मंत्रालयाकडून करण्यात आलं आहे.
अधिक बातम्यांसाठी मराठा प्रेसचे सद्यःस् तयार करा