
मुंबई मेट्रो 7A प्रगतीपथावर: मेअखेर भुयारी बोगदा पूर्ण, डिसेंबर 2026 ला सेवा सुरू
२५ एप्रिल: मुंबई :मुंबईमध्ये आता मोठ्या प्रमाणावर मेट्रोचं जाळं तयार केलं जात आहे.अलीकडेच मेट्रो 7A या मार्गिकेसाठी एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे. लवकरच या मार्गिकेतील भुयारी बोगद्याचं काम पूर्ण होणार आहे. मेट्रो 7A हा मार्ग मुंबईतील विविध मेट्रो प्रकल्पांना एकत्र जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे.
शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (T2) ते अंधेरी पूर्व मेट्रो 7 दरम्यान दुसऱ्या भुयारी बोगद्याचं काम मे महिन्याच्या अखेरीस पूर्ण होईल. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) कडून मेट्रो 7A मार्गाची उभारणी सुरू आहे. ही मार्गिका एकूण 3.4 किमी लांबीची असून त्यामध्ये एक उन्नत आणि एक भूमिगत स्थानक आहे.
‘दिशा’ किंवा टनेल बोरिंग मशीन मदतीने 1.65 किमी लांबीच्या डाऊनलाईन बोगद्याचं काम नुकतंच पूर्ण झालं आहे. आता उर्वरित दुसऱ्या बोगद्याच्या केवळ 100 मीटरच्या कामासाठी MMRDA प्रयत्नशील आहे. हे काम मेअखेर पूर्ण होईल, असा अंदाज आहे. त्यानंतर संपूर्ण मार्गिका सुरू होण्यासाठी दीड वर्ष लागणार असून, डिसेंबर 2026 पर्यंत मेट्रो सेवा सुरू होईल.
मेट्रो 7A मार्गिकेमुळे मीरा भाईंदर येथून आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या T2 टर्मिनलपर्यंत येणे थेट शक्य होणार आहे. मेट्रो 9, मेट्रो 7 आणि मेट्रो 7A ही मार्ग एकमेकांना जोडली जात असल्याने प्रवाशांना याचा मोठा लाभ होईल.