
कलमा म्हणताच वाचला जीव; प्राध्यापकाने सांगितला पहलगाममधील थरकाप उडवणारा अनुभव
25 एप्रिल काश्मीर: काश्मीरजवळील पहलगाम जवळील बैसनर खोऱ्यात मंगळवारी दुपारी पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याने देशभरात खळबळ उडवली आहे. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला असून २० हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी काही पर्यटकांचे धर्म विचारून त्यांना लक्ष्य केलं. या भीषण घटनेत आसाममधील एका प्राध्यापकाने प्रसंगावधान राखून आपल्या कुटुंबाचा जीव वाचवला आहे.
आसाम विद्यापीठाचे असोसिएट प्राध्यापक देबाशिष भट्टाचार्य यांनी आपल्या पत्नीसह मुलासोबत पहलगामला फिरायला गेले होते. गोळीबाराची झाल्यात ते बैसनर खोऱ्यात एका झाडाखाली विश्रांती घेत होते. परंतु अचानक गोळ्यांचा आवाज येऊ लागला. आजूबाजूला अफरातफरी माजली. काही लोक जोरात कलमा म्हणत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. ते सांगतात, “माझ्या आजूबाजूला लोक ‘ला इलाहा इलाल्लाह’ म्हणत होते. मी घाबरून त्यांच्या जवळ जाऊन बसलो आणि मीसुद्धा कलमा म्हणू लागलो.”
थोड्याच वेळात एक दहशतवादी त्यांच्याजवळ आला आणि विचारलं, “तू काय म्हणतोस?” त्यावर भट्टाचार्य यांनी अजूनच जोरात कलमा म्हणायला सुरुवात केली. काही क्षण तो दहशतवादी त्यांच्याकडे पाहत राहिला आणि मग तिथून निघून गेला. भट्टाचार्य म्हणाले, “मला कोणी कलमा म्हणायला सांगितलं नव्हतं, पण आजूबाजूचं पाहून मीसुद्धा तसंच केलं. तेच माझ्या जीवावर आलं.”
गोळीबार थांबल्यानंतर भट्टाचार्य यांनी आपली पत्नी आणि मुलाला घेऊन तिथून धाव घेतली. सुमारे दोन तास त्यांनी जंगलातून पायी प्रवास केला आणि शेवटी एका स्थानिक व्यक्तीच्या मदतीने पुन्हा पहलगामच्या मुख्य भागात पोहोचले. आसाम सरकार म्हणूनच घटनेनंतर तत्काळ हालचाल करत आसाममधून शक्यतो त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी घेतली आहे तर त्यांना शक्यतो तितक्या लवकर आसाममध्ये परत आणण्यासाठी प्रयत्न ही सुरू आहेत. ट्विटरवर याबाबत माहिती देताना मुख्यमंत्री कार्यालयाने म्हटलं आहे की, “कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. केंद्र सरकारशी समन्वय साधून त्यांना लवकरच परत आणले जाईल.”
दरम्यान, काही प्रत्यक्षदर्शींनी असा आरोप केला आहे की हल्लेखोर पर्यटकांचा धर्म विचारून त्यांना लक्ष्य करत होते. “राम नाम म्हणणाऱ्यांवर विशेष लक्ष द्या,” असे एकमेकांना सांगताना काही दहशतवाद्यांचे बोलणे त्यांनी ऐकले होते, असा दावा काही जणांनी केला आहे.
प्राध्यापक भट्टाचार्य आणि त्यांचे कुटुंब सध्या सुरक्षित असून ते २६ एप्रिल रोजी श्रीनगरहून आसामला रवाना होणार आहेत. पहलगाममधील हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क असून परिसरात शोधमोहीम राबवली जात आहे.
अधिक बातम्यांसाठी मराठा प्रेस चे सदस्य बना