
{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"transform":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}
‘लाडकी बहीण’ योजनेंच्या नावाखाली कोट्यवधींचा घोटाळा; गुजरातहून २५०० मुंबईकरांची फसवणूक उघड
12 मे मुंबई: विधानसभा निवडणुकीत गेम चेंजर ठरलेल्या ‘लाडकी बहीण’ योजनेच्या नावाखाली तब्बल २५०० मुंबईकरांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबईतील झोपडपट्टी भागातील नागरिकांची फसवणूक करून त्यांच्या नावाने बँक खाती उघडली गेली आणि ही खाती सायबर गुन्हेगार व मनी लॉन्ड्रींग करणाऱ्यांना विकली गेली. जुहू पोलिसांनी या प्रकरणी तीन आरोपींना अटक केली आहे.
गुजरातच्या सूरतहून आलेल्या टोळीने धारावी, डी.एन. नगर आणि नेहरू नगरसारख्या प्रदेशातील नागरिकांना ‘लाडकी बहीण’ योजनेंतर्गत दरमहा ₹१५०० मिळतील, असं सांगून विश्वासात घेतलं. खातं उघडण्यासाठी आधार व पॅन कार्ड मागवण्यात आले आणि प्रत्यक्षात सुरुवातीला ₹१००० देण्यात आले. मात्र त्यानंतर खाती सायबर गुन्हेगारांना विकली गेली.
हे प्रकरण वलिक सय्यद खान या मजूराच्या तक्रारीनंतर उघडकीस आलं. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत मुख्य आरोपी अविनाश कांबळे (२५, वसई) याला अटक केली. त्याने एका खात्यामागे ₹४००० मिळत असल्याची कबुली दिली आहे. पोलिसांच्या तपासात समोर आलं की ही टोळी गरिब व अशिक्षित नागरिकांना लक्ष्य करून त्यांचं संपूर्ण वैयक्तिक माहिती घेऊन खाती उघडायची आणि ती खाती फाल्गुनी जोशी, रितेश जोशी आणि श्रृती राऊत यांना विकायची.
जुहू पोलिसांनी १०० हून अधिक बँक खाती गोठवली असून, त्यातील रक्कम सुमारे ₹१९.४३ लाख आहे. या खात्यांतून कोट्यवधींचे व्यवहार झाल्याचं उघड झालं आहे. पोलिसांनी संशयितांच्या घरांवर छापे टाकून अनेक पासबुक, डेबिट कार्ड व सिमकार्ड जप्त केली आहेत.
ही खाती सायबर गुन्हे, मनी लॉन्ड्रींग आणि काळ्या पैशांच्या व्यवहारासाठी वापरण्यात आली होती, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षकांनी दिली. तपास सुरू असून अधिक अटकांची शक्यता आहे.
अधिक बातम्यांसाठी मराठा प्रेसचे सदस्य बना