विद्यार्थिनी

“पाकिस्तान झिंदाबाद” पोस्टप्रकरणामुळे पुण्यात १९ वर्षीय विद्यार्थिनी अटकेत

Spread the love

पुणे 10 मे: पुणे शहरात पोलिसांनी एका १९ वर्षीय कॉलेज विद्यार्थिनीला अटक केली आहे. तिच्यावर आरोप आहे की, तिने सोशल मिडियावरील इन्स्टाग्रामवर “पाकिस्तान झिंदाबाद” असा वादग्रस्त मजकूर पोस्ट केला होता.

हा प्रकार समोर आल्यानंतर कोंढवा पोलिस ठाण्यात पोलिस शिपाई सुबाष जरांडे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी ही माहिती दिली असून, या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे.

एफआयआरनुसार, सध्या भारत-पाकिस्तान दरम्यान सुरू असलेल्या लष्करी कारवायांच्या पार्श्वभूमीवर पोलिस सोशल मिडियावर आढावा घेत असताना हा वादग्रस्त मजकूर निदर्शनास आला. सदर विद्यार्थिनी कोंढवा परिसरातील कौसरबाग येथील रहिवासी असून, पुण्यातील एका कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे.

विद्यार्थिनीविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात भारताच्या सार्वभौमत्व, एकता आणि अखंडतेला धोका पोहोचवणारे कृत्य (कलम 152), समाजात द्वेष निर्माण करणे (कलम 196), राष्ट्रीय एकात्मतेविरोधात वक्तव्य (कलम 197), धार्मिक भावना दुखावणे (कलम 299), शांतता भंग घडवून आणण्यासाठी केलेला अपमान (कलम 352) आणि समाजात गैरसमज पसरवणारे विधान (कलम 353) यांचा समावेश आहे.

दरम्यान, सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांनी या प्रकारावर संताप व्यक्त करत कडक कारवाईची मागणी करत कोंढवा येथे निदर्शने केली.

About The Author

You cannot copy content of this page

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com