नाशिकमध्ये आज काय घडणार? हवामान विभागाचा मोठा इशारा!
नाशिकसह आसपासच्या घाट भागांसाठी हवामान विभागाने सोमवार (19 मे) साठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. त्यानंतर 22 मे पर्यंत ‘यलो अलर्ट’ लागू राहणार आहे. या काळात विजासह वादळे, जोरदार पाऊस आणि वाऱ्याचा तुफान अंदाज आहे. गेल्या पाच दिवसांपासून नाशिक आणि जवळच्या भागात सतत पावसाने हजेरी लावली आहे. शनिवार-रविवारी थोडा सुकटावा जाणवला असला तरी आज परिस्थिती पुन्हा बदलण्याची शक्यता आहे.
हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांच्या मते, अरबी समुद्र, बंगालच्या उपसागर आणि साउथ चायना पॅसिफिक महासागर मध्ये कमी दाबाचा प्रदेश तयार होत आहे. या तिन्ही प्रदेशांतील हवामान प्रणाली आणि सायक्लोनिक परिसंचरणामुळे महाराष्ट्रात संपूर्ण आठवड्यात विजा, वादळे आणि जोरदार पावसाची शक्यता आहे.
नाशिकमधील हवामानाचा आढावा
- रविवारी तापमान 33.2°C इतके नोंदवले गेले.
- कधी कधी येणाऱ्या वाऱ्यांमुळे थोडा अस्वस्थ अनुभव आला.
- दुपारी आणि संध्याकाळी प्रवासात अडचणी येऊ शकतात.
नागरिकांनी सर्तक राहणे आवश्यक आहे आणि अधिक ताज्या अपडेट्ससाठी मराठा प्रेसशी संपर्कात राहावे.